Dragon fruit

ड्रॅगन हे एक प्रकारचे फळ आहे. हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्याने लोकांमध्ये त्याची फार उत्सुकता आहे. ड्रॅगन फळांचे शास्त्रीय नाव हायलोसीरीयस अंडाटस असून कॅक्टस कोरफड वर्गातील ही वनस्पती आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी, ही झाडी कायमची जळून जात नाहीत. फळांचा आकार कमी होईल, मात्र झाडे जिवंत राहतील. या पिकाला रोग आणि किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.ड्रॅगन फळाची थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंका या देशात व्यापारी तत्त्वावर लागवडी केल्या जात आहेत. आता आपल्या देशातगुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राज्यात सुद्धा लहान क्षेत्रावर व्यापारीदृष्ट्या पिकाची लागवड होत आहे. तसेच महाराष्ट्रातील कमी पावसाच्या क्षेत्रात उदा. सोलापूर, पुणे (शिरूर), सांगली (जत) येथे सुद्धा व्यापारी तत्त्वावर या पिकाची लागवड सुरू झाली आहे.या फळाची साल अतिशय पातळ व गर लाल व पांढऱ्या रंगाचा असून हे फळ चवीला गोड आहे. या फळाचा उपयोग विविध प्रक्रिया करून खाद्य उद्योगात केला जातो. जसे की, फळाचा रस, शरबत, जाम, काढा (सिरप) आइस्क्रीम, योगर्ट (४०9५) मुरंबा (जेली), कँडी पेस्ट्री इ. कधी कधी फळाचा गर हा पिझ्झा किंवा वाईन तयार करण्यासाठी देखील केला जातो. या फळाचे औषधी उपयोग पण आहेत. डेंग्यू व मलेरिया आजारात हे फळ खाल्ले जाते, असे मानतात. हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पांढऱ्या पेशीही वाढण्यास मदत होते.

लागवड:
ड्रॅगन फ्रूट रोपांचा प्रसार स्टेम कटिंग्ज किंवा बियाण्यांमधून केला जाऊ शकतो. कलमे निरोगी, रोगमुक्त झाडांपासून घ्यावीत आणि 6-7 pH असलेल्या चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करावी. कटिंग सुमारे 3-4 इंच खोल असलेल्या छिद्रात लावावे आणि कटींग ला मुळे येईपर्यंत माती सतत ओलसर ठेवावी.

Cutting

वाढ : ड्रॅगन फळ वनस्पती पूर्ण सूर्य आणि उच्च आर्द्रता पसंत करतात. फळे जमिनीपासून दूर ठेवण्यासाठी झाडांना ट्रेलीस किंवा सपोर्ट सिस्टमवर वाढण्यास प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांना संतुलित खताने नियमितपणे खत दिले पाहिजे आणि माती सतत ओलसर ठेवण्यासाठी खोलवर पाणी दिले पाहिजे.

Structure

फळ काढणी : ड्रॅगन फळ साधारणपणे लागवडीनंतर सुमारे 4-6 महिन्यांनी काढणीसाठी तयार असते. फळ पिकलेले असते जेव्हा त्वचा लाल होते आणि खवले देठापासून दूर जाऊ लागतात. फळे खेचून काढण्यापेक्षा देठाच्या छाटणीने कापून काढावीत.

Structure